नूल - प्रतिनिधी
नूल येथील श्री सुरगीश्वर मठात लिंगेक उपचार्य रत्न श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या तिसऱ्या पुण्याराधना दिनानिमित्त सेवासदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत आणि श्री सुरगीश्वर मठाच्या सहकार्याने आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 250 रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधें देण्यात आली. प्रारंभी लिंगेक श्री चंद्रशेखर महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन श्री गुरूसिध्येश्वर महास्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला कार्तिक स्वामी आणि मठाच्या शिष्यानी वेदघोष सादर केला. स्वागत श्री रामगोंडा पाटील यांनी केले. श्री संजय थोरात यांनी प्रास्ताविक केले.यावेळी श्री गुरूसिध्येश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते डॉ. नागेश पट्टनशेट्टी, डॉ. पुजा गडेकर, डॉ. निखिल गोरुले, डॉ. श्रद्धा देसाई, नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. कपिल, सरपंच सौ. प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे,पोलीस पाटील परशराम सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. नागेश पट्टनशेट्टी व नागेश चौगुले यांची मनोगते झाली. महास्वामीजींचे आशीर्वचन झाले. सूत्रसंचालन व आभार गुरुप्रसाद गुरव यांनी मानले. यावेळी बलभीम यात्रा कमिटीचे पंच रामगोंडा पाटील, धोंडिबा शिंदे, अप्पासाहेब यादव, कल्लापांना देसाई, रावसाहेब शिंदे, चंद्रशेखर माळगी, तुकाराम गायकवाड, आजापा मासतोली, काळे तसेच भीमाप्पा मासतोली, माणिक स्वामी, दयानंद स्वामी, रवी गोटुरे, संजय मुतनाळे, काशिनाथ व्हंजी सह सुरगीश्वर सेवा संघटना, महिला संघटना, कन्या संघटना सह भक्तगण उपस्थित होते.